आमच्याबद्दल

श्री जयदेव अक्कलकोटे

(चाकण MIDC औद्योगिक संघटना चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष)
स्वागत आहे

चाकण MIDC इंडस्ट्रियल असोसिएशन चारिटेबल ट्रस्ट

चाकण MIDC इंडस्ट्रियल असोसिएशन चारिटेबल ट्रस्टची स्थापना 24 जून 2018 रोजी झाली.

आम्ही विविध क्षेत्रांमध्ये तज्ञ मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करून मजबूत व्यवसाय नेटवर्क स्थापित करण्यासाठी समर्पित आहोत. आमचा प्राथमिक फोकस MSEB च्या गलथान कारभारासारख्या समस्यांना सामोरे जाणे, उद्योजकांविरुद्धच्या संघटित गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आणि MIDC द्वारे सार्वजनिक कामांचे वेळेवर अनुसरण सुनिश्चित करणे आहे.


  • MSEB, MIDC, PMRDA इत्यादी गलथान कारभाराला चाप.
  • गावगुंड, अनधिकृत माथाडी, स्क्रॅप माफिया यांना चाप.
  • दर महिन्याला एकदा वेगवेगळ्या उद्योजकता विकासासाठी बिझनेस सेमिनारचे आयोजन.
  • LOCAL TO VOCAL या उक्तीप्रमाणे दर महिन्याला सध्या 10 ते 15 कोटींची अंतर्गत व्यावसायिक उलाढाल; लवकरच प्रति महिना 100 कोटीपर्यंत होणार उलाढाल.
  • दरवर्षी 24 जूनला वृक्षारोपण, भव्य रक्तदान शिबिर आणि सस्नेह भोजन यांचे आयोजन.
  • मालक व कामगार यांच्यामधील दरी कमी करण्यासाठी दरवर्षी MPL क्रिकेट स्पर्धेचे आयोजन. यात मालक किंवा मुख्य अधिकारी टीमचा एक सदस्य असतो आणि सलग 2-3 महिने एकत्र सराव होतो.
  • व्यावसायिक नेटवर्किंग उपक्रम.
  • संघटनेमधील उद्योजक सभासदांचे वाढदिवस सर्वांसोबत साजरे.
  • उद्योजक सभासदांच्या वैयक्तिक उद्योजकीय अडचणींवर संघटनेच्या माध्यमातून तोडगा.
  • Work-Life Balance साठी दर महिन्याचे एका गुरुवारी दुर्ग भ्रमंती व दर 3 महिन्याला एकदा ट्रीपचे नियोजन.
  • रात्रीच्या चोऱ्या व दरोड्यांना रोखण्यासाठी दररोज रात्री 11 ते 6 या वेळेत नाईट पॅट्रोलिंग.
  • दर आठवड्याला 2 वेळा कंपनी समोरील घनकचरा उचलण्याची योजना.

आणि म्हणूनच आम्ही एक अधिकृत उद्योजक संघटना स्थापन केली आहे. तुम्ही या संघटनेमध्ये सामील होऊन संघटनेची तसेच तुमची स्वतःची उद्योगक्षमता वाढवू शकता.

उद्योजकासाठी व उद्योजकतेसाठी स्थापन केलेली ही संघटना आपलीच संघटना आहे.

धन्यवाद!

आमच्या ध्येयाला पाठिंबा द्या आणि बदल घडवा

आम्ही सामाजिक कार्य करत आहोत

Image
आमच्या चाकण MIDC इंडस्ट्रियल चारिटेबल ट्रस्टचे आधारस्तंभ

संघटनेची कार्यकारिणी

अध्यक्ष
श्री जयदेव अक्कलकोटे

+91 9127835555

सचिव
श्री निवास माने

+91 9850843116

खजिनदार
श्री किसन गायकवाड

+91 8888810145

संचालक
श्री प्रविण शिंदे

+91 9127835555

संचालक
श्री दत्तात्रय दगडे

+91 9822604082

संचालक
श्री प्रविण माळी

Call: +91

संचालक
श्री शांताराम तम्हणे

Call: +91

सलाहकार
श्री लक्ष्मण काळे

Call: +91

सलाहकार
श्री प्रशांत गोरे

Call: +91

सलाहकार
श्री श्रीराम हंडीबाग

Call: +91

+

टीम सदस्य

+

ग्राहकांचे पुनरावलोकन

+

जिंकलेली पुरस्कार

+

स्थापने वर्ष

Image
Image
Image
Image
Image
Image